पेंटिंग : डाक्टर लाल रत्नाकर |
बैठ कर तुम्हारे साथ
ली गई कुछ सांस
तुम्हारी बांह में ली गई उच्छवास
इस चांदनी रात में और क्या चाहिए
यह मन नहीं , एक धरती है
तुम मेरे मन में पसर जाओ
जैसे पसरती है धरती पर चांदनी
जैसे पसरता है कोहरा किसी झील पर
फैलती है ख़ुशबू किसी मधुबन में आधी रात
यह रात नहीं है , रात का रंग है
तुम्हारे कंधे और गरदन के बीच रगड़ खाती
मेरी नासिका में फैल रही सुगंध है
यह तुम्हारा खिल-खिल मन और मौन है
तुम्हारी चूड़ियों की तरह खिलखिलाता हुआ
समय का कैमरा दर्ज कर ले
इस चांदनी की ख़ुशबू को
इस चांदनी रात में तुम्हें देखने को
इस चांदनी रात में तुम्हें चीन्ह कर
याद की गठरी में बांध ले
चांदनी मचल ले ज़रा तुम्हारे रूप जाल में
तुम्हारे घने बाल में , रुको मेरी बांह में
इस सर्द रात में तुम्हारी आग
बहुत ज़रूरी है जीने के लिए
तब तक रुको
[ 14 दिसंबर , 2015 ]
***ह्या थंडगार रात्री तुझी आग ***
थोडी लाकडे ,थोडी आग
बसून तुझ्या सवे
घेतले काही श्वास
तुझ्या बाहूत घेतले गेलेले उच्छवास
ह्या चांदणरात्री अजून कोणती आस
हे मन नाही ,एक धरती आहे
तू माझ्या मनात पसरून जा
जसे पसरते धरती वर चांदणे
जसे पसरते धुके कुठल्या तळ्यावर
पसरतो सुगंध जसा मधुबनात अर्ध्या रात्री
ही रात्र नाही, रात्रीचा रंग आहे
तुझ्या खांद्यावर मानेलगत घुसळणार्या
माझ्या नासिकेत पसरणारा तुझा सुगंध आहे
हे तुझे उत्फुल्ल मन आहे मौन
तुझ्या किणकिणणार्या बांगड्यांसारखे प्रफुल्लीत
समय रूपी कॅमेर्याने टिपून घ्यावा
ह्या चांदण्यांचा परीमल
ह्या चांदण्या रात्री तुला पाहून
ह्या चांदण्या रात्री चिन्हांकीत करुन
आठवांचे गाठोडे घ्यावे बांधून
चांदण्या गुंतून राहू दे तुझ्या रूप जालात
तुझ्या दाट कुंतलात, थांब ना जरा बाहूत माझ्या
ह्या थंडगार रात्री तुझ्यातील आग
खूप आवश्यक आहे जगण्यासाठी
तोवर तू थांब
इस कविता का मराठी अनुवाद
अनुवाद : प्रिया जलतारे
***ह्या थंडगार रात्री तुझी आग ***
थोडी लाकडे ,थोडी आग
बसून तुझ्या सवे
घेतले काही श्वास
तुझ्या बाहूत घेतले गेलेले उच्छवास
ह्या चांदणरात्री अजून कोणती आस
हे मन नाही ,एक धरती आहे
तू माझ्या मनात पसरून जा
जसे पसरते धरती वर चांदणे
जसे पसरते धुके कुठल्या तळ्यावर
पसरतो सुगंध जसा मधुबनात अर्ध्या रात्री
ही रात्र नाही, रात्रीचा रंग आहे
तुझ्या खांद्यावर मानेलगत घुसळणार्या
माझ्या नासिकेत पसरणारा तुझा सुगंध आहे
हे तुझे उत्फुल्ल मन आहे मौन
तुझ्या किणकिणणार्या बांगड्यांसारखे प्रफुल्लीत
समय रूपी कॅमेर्याने टिपून घ्यावा
ह्या चांदण्यांचा परीमल
ह्या चांदण्या रात्री तुला पाहून
ह्या चांदण्या रात्री चिन्हांकीत करुन
आठवांचे गाठोडे घ्यावे बांधून
चांदण्या गुंतून राहू दे तुझ्या रूप जालात
तुझ्या दाट कुंतलात, थांब ना जरा बाहूत माझ्या
ह्या थंडगार रात्री तुझ्यातील आग
खूप आवश्यक आहे जगण्यासाठी
तोवर तू थांब
सुन्दर कविता
ReplyDelete